Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

गणपती बाप्पा मोरया!!!

mah94ros

गजाननाला वंदन करूनी
सरस्वतीचे स्तवन करोनी
मंगल शिवपद मनी स्मरोनी
सद्भावाने मुदित मनाने
अष्टांगांची करूनि ओंजळ
वाहतो ही दुर्वांची जुडी

अभिमानाला नकोच जपणे
स्वार्थासाठी नकोच जगणे
विनम्र होऊन घालव मनुजा
जीवन हे हर घडी

विघ्न विनाशक गणेश देवा
भावभक्तीचा हृद्यी ठेवा
आशिर्वाद हा द्यावा मजला
धन्य होऊ दे कुडी

पार्वती नंदन सगूण सागरा
शंकर नंदन तो दुःख हरा
भजनी पुजनी रमलो देवा
प्रतिमा नयनी खडी

Advertisements
आज संध्याकाळ पासून पाऊस लागलाय. विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट, धुवांधार पाऊस……..

मी मनसोक्त भिजून घेतलंय…………

मध्येच जरा रौद्ररूप दाखवतोय तो……

इतका आवेगाने कोसळतोय ते पाहून पटकन सीडी लावली……

गदिमांचे शब्द अन मन्ना डे चे सूर……… क्या बात हैं………

घन घन माला नभी दाटल्या, कोसळती  धारा

केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा

कालिंदीच्या तटी श्रीहरी

तशात घुमवी धुंद बासरी
एक अनामिक सुगंध येतो, ओल्या अंधारा

वर्षाकालिन सायंकाली
लुकलुक करिती दिवे गोकुळी
उगाच त्यांच्या पाठिस लागे भिरभिरता वारा

कृष्णविरहिणी कोणी गवळण
तिला अडविते कवाड, अंगण
अंगणी अवघ्या तळे साचले, भिडले जल दारा

बरेचदा लताच्या येण्याजाण्याच्या वाटेवर, कधी तीन नंबरवरून पाचवर धावताना……. कधी संध्याकाळी एक नंबरवर घड्याळाच्या खाली उभा तो दिसायचा……   तो आसपास आहे हे मनाला कसे कळायचे हे कोडे  कधीच उलगडले नाही. नजर बरोबर त्याला शोधून काढायची. घड्याळाखाली कोणाची तरी वाट पाहत आहे असा दिसला ना……… की फार त्रास व्हायचा. कधी कधी वाटायचे तोही मला शोधत असतो….. मी दिसले की डोळे चमकतात त्याचे. कळेल न कळेल असे हसतही असे तो. कदाचित हे भासही असतील. कधी कधी वाटे बोलावे त्याच्याशी……. एक दोनदा तर माझ्या अगदी शेजारीच होता जीना उतरताना….  लतेने हळूच डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिले तर तो तिच्याकडेच पाहत होता. पूर्ण मिनिटभर बरोबर होतो पण ना त्याने काही म्हटले ना तिने.

दोन-तीन दिवस दिसलाच नाही. चुकामूक होतेय की दुसरेच काही. ना नाव माहीत ना कुठे राहतो ते……. कसे शोधू आता.   आठ दिवस झाले आता…… बरे नसेल का? का गावी गेला असेल? का देशाबाहेर…..??? मूर्ख मुली आता कशाला वाईट वाटून घेतेस, तेव्हा पाहून हसलीही नाहीस. असेच अजून दिवस सरले. चैनच पडत नव्हते…. तशात अचानक एक दिवस संध्याकाळी ट्रेन मधून उतरताना तो दिसला. इतका आनंद झाला. आज त्याच्याशी बोलायचेच हे ठरवून लता पळतच आली तर……. एक गोडशी मुलगी त्याचा हात हातात घेऊन लाडेलाडे बोलत होती. ह्याचा चेहराही आनंदाने फुललेला. दुर्दैव त्याने लतेला पाहिले….

आणि हात उंचावला, तसे त्या मुलीनेही वळून पाहिले. चेहरा कोरा करत लतेनेही हाय केले. घाईघाईने तो म्हणाला, ” अग तुला शोधत होतो मी. दिसलीच नाहीस, सगळ्यात आधी तुला सांगावेसे वाटत होते. ही सुनी….. सुनीता, माझी होणारी बायको. वाटत होते मी प्रेमात पडलोय पण…. सुनीलाही म्हटले, अग मला ठरवून पाहून लग्न नव्हतेच करायचे. पण काय करणार, काहीतरी चुकलेच. बरं ते जाऊ दे. ही पत्रिका….. येशील ना नक्की? अशी नाही तर तशी तरी……. ”

कोसळणारे रडू निकराने दाबत लतेने हो म्हटले, पत्रिका घेतली अन त्याचे शेवटचे अतिशय कुजबुजते वाक्य ऐकून……. दोन अश्रू ओघळलेच. ते पाहिले मात्र त्याचा चेहरा विदीर्ण झाला. नजरेनेच विचारत होता, “का गं, का अशी शिक्षा…. चुकलो गं मी. काही बोललो नाही पण तू तरी….. मुखदूर्बलतेची एवढी मोठी शिक्षा? ” लताने सुनीकडे पाहून बाय केले आणि ती तिथून पळत सुटली. आज तिला स्वतःपासूनही दूर जायचे होते…… खूप दूर.

असा बेभान हा वारा….

असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ ?
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ ?

जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जिवाचे पूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडिले धागे
बुडले गाव ते आता, बुडले नावही मागे
दिले, हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ ?

जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया, हे तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ ?

एका आर्त विरहीणिचे हे गीत पाडगावकरांनी कोणाच्या विरहात रचले असावे? एक एक शब्द माळेत अचूक सुंदर मोती ओवल्यासारखा. हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत अन लताचा ह्या शब्दांना बेभान करणारा स्वर….
काटा आला  अंगावर…….
बरेचदा रात्रीच मी हे गाणे ऐकते….
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती…………………………. किती मी हाक ही देऊ?

वाटतं काळजाच्या अगदी जवळ असलेलं माणूस त्याच्यात विलीन होण्यासाठी चाललेली सारी धडपड…………..

बुडले गाव ते आता, बुडले नावही मागे…….

सुस्वागतम!

मी सुरजमूखी , सूर्याच्या तालावर माझे मूडस सारखे बदलत असतात. तो तळपत असेल तर मी चैतन्याने सळसळत राहते. तो अभ्रांनी झाकोळला तर मी कोमेजून जाते. आठ महिने कभीकभार दर्शन… पण आता समर आहे त्यामुळे…. आम्ही दोघेही चहकतो आहोत.

तुकड्यातुकड्यात, अनेक मुखवट्यात सगळ्यांसारखेच जगणाऱ्या मला मैत्रीची-संवादाची ओढ  आहे. निखळ, अपेक्षाविरहीत, सुख-दुःख शेअर करणारा मैत्र परिवार….

विषयाची चौकट न पाळता मनमुक्त गप्पा….